केंद्र शासना मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षा एन.एम.एम.एसमध्ये शिरोली हायस्कूल, शिरोली पुलाची मधील राजवीर संभाजी भोसले, कु.सिद्धी शरद गोदणे, विद्यासागर जयसिंग कांबळे यांना प्रत्येकी रुपये 48000/- ची केंद्र शासनाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली तसेच महाराष्ट्र शासनाची सारथी शिष्यवृत्ती प्रत्येकी रुपये 38400/- ची प्राप्त झाली. सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी अनुष्का सचिन पोवार,सम्राट संदीप पोवार,वेदांत अतुल अंडी,श्रावणी महादेव पाटील,सई विनायक पाटील,शौर्य सचिन पोवार,आदिती अमोल चौगुले,कु.श्रावणी सुनील गाडवे,समर्थ संभाजी भाट,कु.करुणा सुनील कित्तूर,संकेत संतोष शिंदे,
पार्थ सागर कोगळुनकर,यश हरीश जाधव यांचा समावेश आहे.सदर विद्यार्थ्याना आर.एम.मारापुरे,सौ.एस.एस. पाटील, सौ.एन.एस.पाटील,मुख्याध्यापक एम.एस.स्वामी पर्यवेक्षिका सौ.एस.एस.गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत संकल्प विद्यामंदिर चे राज्य स्तरावर 19 विद्यार्थी, जिल्हा स्तरावर 20, तालुका स्तरावर 19 , तर केंद्रात 12 एकूण 70 विद्यार्थ्यानी यश संपादन केले. त्यांना मुख्याध्यापिका सौ.अश्विनी यादव व संकल्प शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल पालक व शिक्षक यांनी संपूर्ण गावात सुवाद्य अभिनंदन मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत पालक ,शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणीय होता.संस्था चेअरमन सुरेश तात्यासाहेब पाटील,अध्यक्ष सलीम हिम्मतसो देसाई, सेक्रेटरी कृष्णात गणपती खवरे यांची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.