शिरोळ नगरपरिषदेच्या करवसूलीला स्थगिती – पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

कर थकबाकीमध्ये मोठी तफावत, मुख्याधिकरी यांना घातला घेरावा

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेच्या घरफाळा, पाणीपट्टी कर वसूलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असलेने चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना घेराओ घातला. अखेर चर्चेअंती मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ता धारकांची कर व त्यावरील व्याज दंड वसुलीस स्थगिती देत असल्याचे लेखी पत्र दिले असल्याची माहिती युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
श्री यादव बोलताना पुढे म्हणाले, शिरोळ नगरपरिषदेकडील सन २०२०-२१ ते सन २०२१-२२ या वर्षात झालेल्या लेखा परीक्षण अहवालात कराच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. या बाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत सन २०२४ मध्ये पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे चौकशी व कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी मनमानी कारभार करून संबंधितांना वाचवण्याच्या प्रयत्न करीत असल्याने निरदर्शनास आले त्यामुळे मंगळवारी थकीत करवसूली तफावतीबाबत मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी या संदर्भात लेखी पत्र दिल्याशिवाय मुख्याधिकारी प्रचंडराव यांना कार्यालय बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका यादव व त्यांच्या समर्थकांनी घेतली तद्नंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी वस्थूस्थिती मान्य केली. त्यानंतर नगरपरिषद कर वसूली विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शब्दांचा भडिमार करत यादव यांनी मागील कर वसूली रेकॉर्डमधील चुका सर्वांसमोर मांडल्या, त्यात आर्थिक वर्षांचा उल्लेख नसणे, शिक्का नसणे व दफ्तर बांधणी यातील गंभीर बाबी सर्वासमोर उघडकीस आणल्या अहेत. यामुळे कर वसुलीच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. अखेर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी नरमाईची भूमिका घेत सन २०२० ते २०२२ मधील थकीत कराच्या तफावतीबाबत अनुपालन अहवाल व फरक मिळकतधारक यांची यादी सादर झाल्यानंतर व त्यांची मंजूरी मिळेपर्यंत नगरपरिषदेच्या करवसूली मोहिमेस स्थगिती देत असल्याचे मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती श्री यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

error: Content is protected !!