शिरोळ / प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे श्री पद्माराजे विदयालय शिरोळमधील सहाय्यक शिक्षिका श्रीमती दाभाडे वैशाली जगन्नाथ यांची यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या वतीने शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या -” शरद पवार इन्स्पायर फेलोशिप – सन २०२४ – २५ ” साठी त्यांच्या ” हस्तकलेच्या माध्यमातून विदयार्थ्यांमध्ये जीवनावश्यक आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास” या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.प्रकल्पासाठी विदयालयामध्ये ” हस्तकला मंच ” स्थापित करण्यात आला आहे.” संस्कृती जपूया, भविष्य घडवूया ” – हे या हस्तकला मंचचे ब्रीद वाक्य असून विदयार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध हस्तकला कौशल्यांचा विकासासाठी नवीन संधी,एक व्यासपीठ विदयालयामध्ये तयार झाले आहे .
या प्रकल्पांतर्गत विदयालयात हस्तकलेचे विविध उपक्रम जून महिन्यापासून सुरू आहेत. हस्तकलेतील – मेहंदी रेखाटन,रांगोळी रेखाटन, क्विलिंग आर्ट,आधुनिक व पारंपरिक ज्वेलरी मेकिंग , हूप आर्ट,जरीअरी वर्क या कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून, विदयार्थ्यामध्ये जीवनावश्यक कौशल्य विकास साधण्याबरोबर भविष्यासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्यांचाही विकास साधला जात आहे.
विदयार्थ्यांना शालेय विषयाच्या अध्ययनाबरोबरच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे,पारंपरिक हस्तकलेची जोपासना करणे, हस्तकला कारागिरांविषयी आदर व सन्मानाची वृत्ती वाढविणे,आत्मनिर्भर बनविणे अशी अनेक उद्दिष्ट्ये समोर ठेऊन हा प्रकल्प विदयालयामध्ये सुरू आहे.या प्रकल्पास पंचायत समिती,शिक्षण विभाग , शिरोळच्या गटशिक्षणाधिकारी मा. भारती कोळी ,यशवंतराव चव्हाण सेंटर ,मुंबई .शिक्षण विभाग प्रमुख मा.योगेश कुदळे यांनी भेट दिली असून शिरोळ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण आंनदमय वातावरणात दिले जात असल्याबद्दल प्रकल्प प्रमुख सहाय्यक शिक्षिका श्रीमती दाभाडे वैशाली यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.या प्रकल्पास विद्यालयाचे प्राचार्य मा.मुल्ला ए.ए.,उपप्राचार्य मा.गंगधर टी.आर.,कला शिक्षक मा. अविनाश माने,मा. मगदूम व्ही . व्ही.यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सौ.पाटील व्ही.व्ही.,सौ.मगदूम व्ही.व्ही.,सौ कांबळे व्ही.पी.,सौ पाणदारे एम. के. तसेच पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविला जात आहे .