शिरोलीत प्रशांत कोरटकर यांचा डिजिटल फलकाला जोडे व प्रतीकात्मक फलकाचे दहन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल

 

आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर व सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांच्या निषेधार्थ घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे शिरोली पुलाची येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दहन करण्यात आले .

शिरोली पुलाची ता हातकणंगले येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखालील आज प्रशांत कोरटकर व सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांचा निषेध व्यक्त करत त्याच्या प्रतिकात्मक फोटोस गावातून जोडे मारत शिरोली फाटा येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले सोलापूरकर व कोरटकर याने काही दिवसापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य करत , इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे यांचा निषेध व्यक्त करत शिरोली गावातील शिवभक्तांनी भगव्या टोप्या परिधान करत एकत्रित येवून सोलापूरकर व कोरटकर यांचा केला

यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे ,बाजीराव सातपुते , विठ्ठल पाटील ,अतुल शिंदे ,रणजीत केळुसकर ,योगेश खाडे ,सचिन पवार ,सरदार मुल्ला ,अनिल चौगुले ,सतीश रेडेकर , अनिल शिंदे ,पप्पू नार्वेकर ,अमित शिंदे ,सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते .

error: Content is protected !!