पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये ता करवीर नागपूर रत्नागिरी रोडवरील ब्रिजच्या कामाचे दिड लाखाचे लोखंडी सेट्रींग साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने अज्ञात व्यक्ती विरूद्ध शिरोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .नव्याने सुरू असलेल्या नागपूर रत्नागिरी रोडवरील शिये गावच्या हद्दीत मेघा इजिनिअर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लीमीटेड कंपनीमार्फेत रोडवर ब्रिज बनविण्यासाठी लागणारे साहीत्य त्यामध्ये सेट्रींग प्लेट, हंच प्लेट, पाईप जॅक, यु जॅक, बेस जॅक असे एकुण १,४८,२५० रुपयाचे सेट्रींग साहित्य अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे.