पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुलाची शिरोली येथे दि .२७ फेब्रुवारी रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त सार्वजनिक मंडळाचा दशक्रिया विधी कार्यक्रम नाभिक समाज नियोजित जागा बिरदेव तलाव येथे पार पडला छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे .
रायगडाच्या माथ्यावरून कडाडला छावा
जणू सह्याद्रीच्या छातीत उसळला लाव्हा
हैराण करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा
बलदंड ताकदीचा वीर ऐसा जो ना कळला देवा!
घायाळ होई युद्धभूमी ऐसी तळपली तलवार
थरथर काप गनीम असा त्या नजरेचा वार
रक्तपाजे रणांगणा होऊनि शत्रूवर स्वार
वार घेई छातीवर, बोथट होई तलवारीची धार
स्वराज्यासाठी रुळली इथे बलिदानाची प्रथा
झुकेल कसा छावा ज्याचा छत्रपती शिवराय पिता
पत्कारितो मरण, मृत्यू टेकवी माथा
अजिंक्य पराक्रमाची जगी एकच ही गाथा!
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण केले. हेच स्वराज्य पुढे वाढविण्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले.ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुष, धर्मपुरुष जन्माला येतात. आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.
यासाठी प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मास आचरण्यात येतो. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी आपल्या प्राणाचं तब्बल ३० दिवस (फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) औरंगजेब चे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं, ते बलिदान हिंदूधर्म कधीच विसरू शकत नाही. फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत बलिदान मास पाळण्यात येतो. रविवार २७ फेब्रुवारी पासून (सकाळी ६:३० वाजता) बलिदान मासची सुरुवात झाली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले.धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलीदान निमित्त दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसा पासून ते मुर्तु पर्यंत जे हाल झाले त्यांची उतराई म्हणुन धारकरी दरवर्षी १महिन दुखटा पाळतात यामध्ये १महिना गोड पदार्थ,१वेळचे जेवण आणि मांसाहार तसेच दररोज संध्याकाळी संभाजी महाराजांना संध्याकाळी श्रद्धांजली वाहिली जाते सामुदायिक मुंडनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कोल्हापूर जिल्हा पालक कार्यवाहक विठ्ठलराव पाटील , सुरेश यादव तसेच शिरोली कार्यवाह अर्जुन चौगुले, सचिन जाधव , सागर चव्हाण, रवी सावेकर आणि लहान मुले यांच्यासह ४० जनांनी मुंडे केले यासाठी नाभिक समाजातील राहुल चव्हाण, शरद वाडकर, राजेंद्र काशिद, रोहित काळे, संतोष राऊत यांचे सहकार्य लाभले