राजर्षी शाहू पतसंस्थेला सलग नवव्यांदा “बँको पतसंस्था पुरस्कार”

Spread the love
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्था क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राजर्षी शाहू पतसंस्थेने आपल्या उज्ज्वल कामगिरीची परंपरा कायम ठेवत सलग नवव्यांदा “बँको पतसंस्था पुरस्कार” पटकावला आहे.सन २०२३/२४ या आर्थिक वर्षात ८० कोटी ते १०० कोटी ठेवी गटात द्वितीय क्रमांक मिळवून हा मानाचा पुरस्कार संस्थेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकवर्षी देण्यात येणाऱ्या  “बँको पतसंस्था पुरस्काराचे वितरण लोणावळा येथे आयोजित शानदार सोहळ्यात पार पडला.पुरस्कार स्विकारल्यानंतर चेअरमन उगारे म्हणाले संस्थेच्या आर्थिक स्थैर्यातील उल्लेखनीय वाढ झाली असून संस्थेने १०० कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे.ठेवीदारांचा विश्वास,तसेच कार्यक्षम व्यवस्थापन यामुळेच हा बहुमान पटकावता आला.संस्था आगामी काळात सदस्य व ठेवीदारांना आणखी अधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने नव्या योजना आणण्याचा मानस बाळगून आहे.पतसंस्थेच्या या यशामागे ग्राहकांचा विश्वास,कर्मचाऱ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनाचे कुशल नेतृत्व आहे.हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेचे चेअरमन रावसो उगारे यांनी स्विकारला.त्यांच्या समवेत व्हा.चेअरमन महावीर पोमाजे,किरण आलासे,माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,जिंनगोंडा पाटील, आण्णासो गुदले,दौलत कांबळे,विजयकुमार जोंग, धोंडीराम चौगुले,अभिजित पाटील,मिरअहमद बागवान, सतिश उपाध्ये व जनरल मॅनेजर संजय गजन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!