ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा मध्ये घवघवीत यश

Spread the love

ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा मध्ये घवघवीत यश संपादन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोवा येथे २/२/२०२५ रोजी ९व्या अंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या यामध्ये नेपाळ, श्रीलंका, आशिया विविध देशातून एकुण ११५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कुलच्या ६ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता टिंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समोरील प्रतिस्पर्ध्यास कडवे आव्हान देत त्यांनी उत्तुंग कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मधील सहभागी विद्यार्थी तेजास्वनी पाटील या विद्यार्थिनीने कुमिते या प्रकारात दुसरा क्रमाक व काता या प्रकारात तिसरा क्रमाक पटकवला.
आर्यन बडोदे याने कुमिते मध्ये प्रथम क्रमांक, शेहजाद शेख याने कुमिते प्रथम क्रमांक, विराज पाटील याने कुमिते द्वितीय क्रमांक, रोहन हाराळे याने कुमिते द्वितीय क्रमांक व त्रिशा माचक या विद्यार्थिनीने कुमिते मध्ये तृतीय क्रमांक मिळवले. या सर्व विदयार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष संतोष बाटे, प्राचार्य सौ.मनीषा बाटे , व क्रीडा प्रशिक्षीका दिक्षा लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!