हातकणंगले / प्रतिनिधी
धनगर समाजातील दोन गटातील जुन्या वादातून काटी कुराड घेऊन मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग, अरुण शिवाजी जोग, आकुबाई यशवंत शिनगारे, रूपाली काशिनाथ शिनगारे, सानिका मंगु शिनगारे हे पाच जण जखमी झाले. यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल आहे.
हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या येसाबाई सबाजी शिनगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता गणेश नगर मध्ये सुरू होता. यावेळी वृषभ महाळू शिनगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आली होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाई चे भाऊ अरुण जोग आणि गणेश जोग हे माणगाव हून आले होते. त्यांचा भाचा वृषभ याला मारहान झाल्याने त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिणगारे, तानाजी शिधा शिणगारे, काशीनाथ भिकाजी शिणगारे,सागर शिनगारे, संभाजी शिवा शिणगारे, अनिल बिरु शिणगारे, म्हाळु कृष्णा शिणगारे, सौरभ भरमा शिणगारे, तुषार बिरु शिणगारे, भिकाजी बापु शिणगारे, माणिक भिकाजी शिणगारे, बापू भिकाजी शिणगारे, गीता तानाजी शिणगारे, हौसाबाई भिकु शिणगारे, रेखा संभाजी शिनगारे, संगीता कृष्णांत शिणगारे तानाजी शिणगारे, लता काशीनाथ शिणगारे सर्व रा. रुकडी यांनी काठ्या, कुऱ्हाड आणि वगढ ने मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.तर आकुबाई यशवंत शिनगारे, रूपाली काशिनाथ शिनगारे, या तिघींच्या हाताला मारहाण झाल्याने जखम झाली आहे. त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. याबाबत सर्जेराव शिनगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जणांच्या वर तक्रार दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.