कुरुंदवाड / प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानवांविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी कुरुंदवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार निदर्शने केली.या निदर्शनांदरम्यान अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडा-मार करून संताप व्यक्त केला.शहा यांच्या निषेधार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.दरम्यान शहा यांची प्रतिमा दहन करण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला.सपोनि रविराज फडणीस आणि पोलिसांनी प्रतिमा हिसकावून घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांच्या झटापट झाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात स्थानिक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि निदर्शनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाफ म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे.निर्माण केलेल्या घटनेच्या आधारावरच आज तुम्ही संसदेत काम करत आहात.यापूर्वीही वेळोवेळी महामानवांच्या बाबतीत चुकीची वक्तव्य करून अवमान केला आहे.आमच्या अस्मितेचा अवमान केला असून हे आता आम्ही सहन करणार नाही केंद्र सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, धम्मपाल ढाले,राजू आवळे, बबलू पवार, जय कडाळे,शाहीर आवळे,तानाजी आलासे, दिलीप बंडगर,शशिकांत तोबरे, सुरज शिंगे आदींनी निशेधात्मक भाषणे केली.यावेळी प्रमोद कांबळे,विक्रम माने,विनायक कांबळे,अमोल गायकवाड,सुशांत सनदी,विशाल मधाळे,अक्षय ऐवाळे,रवी आवळे,चंद्रकांत तोबरे, अभिनंदन मधाळे आप्पासो मधाळे,कृष्णा बनसोडे,गौरव आदमापुरे अनिकेत रत्नाकर,कुणाल कांबळे,सुशांत गोरे,सतिश ढाले,अमोल कांबळे,समीर ढाले आदी उपस्थित होते.