कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाडच्या आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिक व शेतकऱ्यांकडून तृतीयपंथीय व्यक्ती बळजबरीने पैसे वसूल करत आहेत. गुरुवारी आठवडी बाजारादरम्यान भरमसाठ वसुली करत आहेत.त्यांना पैसे न दिल्यास अपमानास्पद भाषा,अरेरावी आणि असभ्य वर्तन करत असतात त्यामुळे व्यापारी खूपच वैतागले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कुरुंदवाड शहर व्यापारी असोसिएशन निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, तृतीयपंथी व्यक्ती आल्यानंतर त्यांना व्यापारी 10 ते 20 रुपये नेहमी देत असतात मात्र हे तृतीयपंथी व्यक्ती ज्या प्रकारे जबरदस्ती करतात, त्याने व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. बाजारात येणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्ती मेकअप करून व्यापारी, ग्राहक आणि विक्रेत्यांना लक्ष्य करतात. पैसे न दिल्यास अश्लील वर्तन आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करतात तर मी अल्पभूधारक शेतकरी आपला भाजीपाला विकत बसलेले असताना त्यांच्याकडूनही जबरदस्तीने हे तृतीयपंथी व्यक्ती वसुली करतात 50 ते 100 रुपये घेतल्याशिवाय जात नाहीत.बळजबरीने पैसे मागणे हा प्रकार व्यापाऱ्यांना पेलत नाही.कायद्याने अशा प्रकारे पैसे मागण्याचा कोणालाही अधिकार नाही.आम्ही स्वखुशीने मदत करू, पण अशा बळजबरीला आम्ही कधीही मान्य करणार नाही तरी पोलीस प्रशासनाने त्वरित तृतीय पंथी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी असे म्हटले आहे.निवेदनावर अभय पाटुकले,अविनाश गुधले, मोहन मानगावे, प्रताप चव्हाण, दीपक निटवे, अण्णासाहेब खोत, सुभाष शिकलगार, विद्याचंद्र शहा, गुलाब बागवान, प्रदीप अमर शेट्टी, मच्छिंद्र कांबळे, मनीष नरसिंगाणि, शहानवाज मनेर, प्रमोद श्रीधनकर आदी व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.