पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुणे येथे पार पडलेल्या 19 वा अखिल महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा मध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस नाईक/670 युगराज खानू पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले.दिनांक 7.12.2024 ते 12.12.2024 दरम्यान पुणे येथे 19 वा अखिल महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या कर्तव्य मेळाव्यात एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून 23 संघ सहभागी झाले होते या कर्तव्य मेळाव्यात क्राईम इन्वेस्टीगेशन अँड फोटोग्राफी या स्पर्धेत एकूण 46 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये 76 गुण मिळवून युगराज खानू पुजारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.राज्य राखीव पोलीस दलाला महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे ते पहिले अंमलदार होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला सांगता समारंभावेळी मा. IPS रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून त्यांचा उचित बहुमान करण्यात आला.