अचानक ब्रेक मारल्याने ट्रॅक्टरने दिली टेम्पोला जोराची धडक

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाची ट्रॉली व सिमेंट पाईपची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा मयूर फाटा शिरोली एमआयडीसी येथे अपघात झाला.हा अपघात आज शुक्रवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.अपघातानंतर एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे होती.याबाबत घटनास्थळावरून माहिती अशी की,ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊस घेऊन बांबवडे येथील उदयसिंगराव गायकवाड कारखान्याकडे जाण्यासाठी वाठारच्या दिशेने चालला होता.हा ट्रॅक्टर शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाट्यावर आला असता एमआयडीसी येथुन सिमेंट पाईप भरलेला टेम्पो रस्ता क्रॉस करत असताना समोर वाहन आल्याने टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर नियंत्रित न राहील्याने ट्रॅक्टरने टेम्पोला जोराची धडक दिली.यामुळे ट्रॅक्टरची पुढील चाके टेम्पोच्या खाली गेली.त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने वाहने मागे पुढे घेता आली नाही.मार्गाच्या मध्येच हा अपघात झाल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे ठप्प झाली होती. जवळपास तावडे हॉटेल पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.ही घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी  आले. त्यानंतर क्रेन बोलविण्यात आली,पण वाहतूक ठप्प असल्याने क्रेन येण्यास उशीर झाला.सुमारे तासाभराने वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिरोली एम आय डी सी पोलीसांनी ही वाहतूक सुरळीत केली.या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा मुद्दा चर्चेत आला आहे.ज्या ठिकाणी महामार्गावरून वाहतूक सेवा रस्त्याला वळविली आहे व ज्याठिकाणी रस्ता क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.अपघाताची पुलाची शिरोली पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

error: Content is protected !!