नवनवीन संकल्पना तयार करून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची उंची वाढवा – इंगवले

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

नवनवीन संकल्पना तयार करून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची उंची वाढवा ‘गोरगरीब कुंटूबातील मुले येथे शिकत असून शिक्षणाचा दर्जा सुधारून मुलांना मजबूत करा असे आवाहान माजी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुणराव इंगवले यांनी केले.ते आळते ता हातकणंगले येथील केन्द्र शाळा येथे मुलाना स्पोटर्स किट वाटप व विद्यार्थांना बक्षीस वितरण सोहळा दरम्यान बोलत होते.यावेळी हातकणंगले पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शरद मेमाने यांनी ही ज्यांनी किट वाटपामध्ये बहूमोल योगदान दिले त्यांच कौतूक केले देण्याची इच्छा जागृत होणे फार गरजेचे आहे ‘विद्यार्थाना सक्षम बनवा असे आवाहान ही त्यांनी केले.
यावेळी लोकनियूक्त सरपंच अजिंक्य इंगवले म्हणाले, येणाऱ्या काळात ही शाळा डिजीटल करू असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक माजी उपसरपंच देवराज कांबळे व माजी उपसरपंच शितल हावळे यांनी केले या कार्यक्रमास अजित कोळाज,विक्रम बनकर,संतोष कांबळे, ऐश्वर्या कांबळे,कविता पांडव, सविता वाघरे,विनायक तेली,विजय हुक्कीरे,अमित आळतेकर,अशिष भबाण,डॉ वाघरे,संजय कांबळे,सुनिल जाधव,अक्षय भोसले,अमोल मजलेकर,सचिन पाटील, अक्षय हावळे,विनय चावरे आदि मान्यवर उपस्थित होते. शेवटी सुतार (सर) यांनी आभार मानले.

error: Content is protected !!