जयसिंगपूर / प्रतिनिधी
हरोली (ता शिरोळ) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विजयपाल बाबुराव चौगुले यांची राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्रिवेदी यांनी चौगुले यांना निवडीचे पत्र दिले आहे.विजयपाल चौगुले यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शिरोळ तालुकाध्यक्ष हे पद देण्यात आले.कोल्हापूर येथील समितीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते विजयपाल चौगुले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल विजयपाल चौगुले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.