कोल्हापूर / प्रतिनिधी
ऊस दराच्या बैठकीला जर साखर कारखानदार हजर राहत नसतील तर तुम्ही काय करालाय असा खडा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात बैठकीला आलेल्या साखर सह संचालकाना धारेवर धरले
यावेळी बैठकीला आलेले सर्व अधिकारी अनुउत्तरीत राहिले.शेट्टी म्हणाले 15 तारखेला साखर कारखाने चालू झाले तर आज 9 तारीख चौदा दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असून कारखानदार देत नाही त्यांच्यावर काय कारवाई केली ते सांगा तसेच आजची बैठक रद्द करा व दुसरी तारीख द्या आणि त्या तारखेला जर कारखादार आले नाही तर जोड्याने हानीन म्हणावं असा दम द्यावा असा सल्ला शेट्टी यांनी साखरसह संचालक यांना दिला.