अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

Spread the love
मोटारसायकलवरुन प्रवास करत असताना बुधवार दि. 31 जानेवारी रोजी रात्री शिरढोण पंचगंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिल्याने योगेश बसाप्पा टाकवडे (वय 27 रा. शिरढोण) हे गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.शुक्रवारी सायंकाळी याचा मृत्यू झाला.मयत योगेश हा जेसीबी मशीन चालक होता.बुधवार दि. 31 जानेवारी रोजी रात्री ते आपल्या मोटासायकवरुन मित्रासह कुरुंदवाडहून शिरढोणच्या दिशेने येत असता मोटारसायकलचा ताबा सुटल्याने पुलाला जोराची धडक दिल्याने योगेश गंभीर जखमी झाला होता.तर त्याचा मित्र (नाव समजू शकले नाही)किरकोळ जखमी झाला होता.जखमी अवस्थेत रात्री त्याला प्रथम सांगली शासकीय रुग्णालयात व नंतर कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते.या अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सायंकाळी उपचार सुरु असतानाच निधन झाले. त्याच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
error: Content is protected !!