‘या’ योजनेत शेडशाळ गाव ठरलं लय भारी,जिल्हातुन कौतुकाचा वर्षाव

शेडशाळ / प्रतिनिधी
शेडशाळ ता शिरोळ येथील आरोग्य उपकेंद्राने भारत सरकारच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करत सुवर्ण कामगिरी केली आहे.गोल्डन कार्ड उद्दिष्ट पुरती करणारे शिरोळ तालुक्यातील शेडशाळ हे पहिले गाव ठरले आहे.त्यामुळे शिरोळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातूनही शेडशाळ उपकेंद्राचे कौतुक होत आहे.भारत सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला विविध आजाराच्या उपचारासाठी मदत व्हावी यासाठी पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत व्हावेत यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजना राबविलेली आहे.सर्वसामान्य जनतेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वत्र आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नागरिकांना काढून देण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.शेडशाळ येथे या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर,पंचायत समिती शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र नृसिंहवाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण यमाटे,आरोग्य सहाय्यक शिवमुर्ती बदामे,दिनकर तराळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शेडशाळ आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून शेडशाळ येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली.यासाठी शेडशाळ ग्रामपंचायतीचे सरपंच किरण संकपाळ,उपसरपंच सौ.भारती लाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य,ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे यांनी शेडशाळमधील घराघरापर्यंत पोहोचून नागरिकांना गोल्डन कार्ड काढण्याबाबत जनजागृती केली.यासाठी शेडशाळ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रियांका दशवंत,आरोग्य सेवक संदीप सरंजामे,आरोग्य सेविका रेखा कोरवी,गट प्रवर्तक रुपाली शहापूरे,शेडशाळ मधील सर्व आशा स्वयंसेविका, सी.एस.सी.सेंटर चालक जावेद पाटील,नितीन नाईक, आयुब पाटील, स्वस्त धान्य दुकानदार राजू पाटील,मसूद पाटील,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक  श्रेणिक डिग्रजे, केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख राजेंद्र यळगुडे,मुख्याध्यापक संदिप कांबळे आदींनी गोल्डन कार्ड नोंदणी बाबत विशेष परिश्रम घेतले. शेडशाळ आरोग्य उपकेंद्रासाठी गोल्डन कार्ड नोंदणीचे उदिष्ट 2994 होते ते 100% पूर्ण करण्यात आले आहे.गोल्डन कार्ड उद्दिष्ट पूर्ती करणारे शेडशाळ आरोग्य उपकेंद्र हे शिरोळ तालुक्यातील पहिले  ठरले आहे.गोल्डन कार्ड उद्दिष्ट पूर्तीचा पहिला मान शिरोळ तालुक्यात शेडशाळ गावाला मिळाल्याने सर्वत्र शेडशाळची सुवर्ण कामगिरी,गोल्डन कार्डमध्ये शेडशाळ ठरले लय भारी असे कौतुकास्पद वाक्य ऐकायला मिळत आहे.
Spread the love
error: Content is protected !!