श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळानिमित्त होणार धार्मिक कार्यक्रम

अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा नववर्षातील २२ जानेवारीला होणार आहे.यानिमित्त संपूर्ण देशभरात लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे.त्या अंतर्गत १ ते १५ जानेवारीदरम्यान शिरोळ शहरातील घरोघरी अक्षता देऊन लोकार्पणाचे निमंत्रण देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कोल्हापूर जिल्हा सहकार्यवाह संतोष पाटील यांनी येथील श्री राम मंदिर नियोजन बैठकीत दिली.या बैठकीस शहरातील सर्वच पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले अयोध्येत श्री प्रभू श्रीरामचंद्र यांचे मंदिर लोकार्पण सोहळ्याचा दिवस जाहीर झाला आहे.त्या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी मंदिरात पुजित अक्षता कलश,प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपुस्तक १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रत्येक घरी देऊन आमंत्रित करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक व्यक्तीला अयोध्या येथे जाणे शक्य नाही.त्यामुळे २२ जानेवारीला आपापल्या परिसरातील मंदिरात २२ जानेवारीला महाआरती,नामजप,संकीर्तन आदी धार्मिक उपक्रम राबवण्यात यावेत.सकाळी ११ वाजता श्री राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरी किमान पाच दिवे प्रज्वलित करून हा दिवस उत्सव म्हणून साजरा करावा,असे आवाहन ही करण्यात आले आहे.यावेळी या बैठकीस माजी आमदार उल्हास पाटील,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी उपसरपंच बाबा पाटील,बी.जी माने,दरगु गावडे,दयानंद जाधव,भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे,नरेंद्र माने,पत्रकार डी आर पाटील,धनाजी पाटील नरदेकर,बजरंग काळे (गुरुजी) प्रवीण चुडमुंगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!