नृसिंहवाडी / प्रतिनिधी
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी(दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज सेवेकर्यांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने श्री गीताई यागासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या तिसर्या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील बावीस ते ते एकोणतीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले.मान्यवरांच्या हस्ते साडेदहाची नैवेध आरती झाली.आरतीनतंर सामुहिक श्री स्वामी समर्थ मंत्र, रामरक्षा,हनुमान चालीसा पठण करण्यात आले.यानतंर यज्ञ विभागात षोडोपचारे पुजा व नित्य स्वाहाकार करण्यात आला.आज गीताई जयंती व मोक्षदी एकादशीनिमित्त धार्मिक मंत्रोपचाराने हवन युक्त श्री गीताई याग संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थितीत होते.दुपारच्या सत्रात श्री दुर्गासप्तशती पाठ व श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे वाचन करण्यात आले.सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा करण्यात आली. साडेसहा वाजता नैवेध आरती झाली.सात वाजता वास्तुशास्त्र विषयावर मान्यवंराचे मार्गदर्शन झाले. सांयकाळच्या सत्रात सप्ताहाकाळातील नित्यध्यान,श्री विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्रपठण,गीतेचा पंधरावा अध्याय, रामरक्षा,हनुमान चालीसा पठण आदी सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.सप्ताहामुळे मंदिरात अखंड 24 तास प्रहर सेवा सुरु आहे.आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकसह,नृसिंहवाडी,पीठापूर,गा णगापूर,तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाचवेळी दत्तजंयतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताह,विविध सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात येत आहेत.सप्ताहाकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामीसेवक,भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकांना सप्ताहाकाळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य,वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,(दत्तधाम) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.