निपाणी हालसिद्ध साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार 

निपाणी / प्रतिनिधी

खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे पदाधिकारी व संचालकांच्या पारदर्शी कार्यप -णालीतून निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कारखान्याने आज अखेर सर्वच क्षेत्रात यशस्वी कार्य सुरु केले आहे.तांत्रिक बाबतीत देखील कारखान्याने यशाचे शिखर गाठले आहे. २०२२-२३ च्या गळीत हंगामात कारखान्याने केलेल्या तांत्रिकबाबीची दखल घेताना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट तांत्रिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या पुरस्काराने कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत हा मानाचा तुरा मानला जात आहे.कर्नाटक शासनाच्या एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युट बेळगाव यांच्यावतीने हा पुरस्कार आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला आहे.एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कर्नाटक सरकारच्या ऊस अभिवृद्धी व साखर आणि शेती उत्पादन मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन एम पी पाटिल व संचालक यांना सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन हा पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.निपाणीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांसाठी तारणहार ठरलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे. आज अखेर साखर कारखान्याने तीन लाख साठ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उचांक गाठला आहे.हा पुरस्कार मिळण्यासाठी कारण असलेले ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्याचे मार्गदर्शक खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचे आम्ही कृतज्ञ आहोत, असे कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले आहे..या प्रसंगी चेअरमन मलगोंडा पाटिल,व्हाइस चेअरमन पवनकुमार पाटील,व्यवस्थापकीय संचालक श्री शिव कुलकर्णी, संचालक अप्पासाहेब जोल्ले ,विश्वनाथ कमते, समित सासणे,अविनाश पाटिल, जयकुमार खोत,प्रकाश शिंदे,, सुनील पाटील ,किरण निकाडे, राजेंद्र शहा ,महालिंग कोठीवाले यांच्यासह अन्य संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!