श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा शिरोळ शहरात भक्तिमय वातावरणात संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची पालखीचे शिरोळ येथे स्वामीभक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन झाले. तसेच अनेक स्वामी भक्तांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकाचे पूजन केले.येथील बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पालखीच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.संत पूजा,दिंडी पूजन,नामस्मरण,भजन सेवा,अन्नपूर्णा पूजन,श्रींची महाआरती,श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थांच्या जयघोषात हजारो भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकाचे दर्शनासाठी गर्दी केली होती.दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.राजीव भैया यांचे जगूया जीवन रोगमुक्त तणावमुक्त या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दुपारी चार वाजता प्रसायदानाने सोहळा संपन्न झाला.यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग काळे,दत्तचे संचालक दरगु गावडे,माजी नगरसेवक पंडित काळे,धनाजी पाटील नरदेकर, दिलीपराव माने,चंद्रकांत महात्मे,अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संचालक व स्वामी समर्थ परिक्रमाचे प्रमुख संतोष भोसले यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुपारी श्री स्वामी समर्थांची पालखी मौजेआगरकडे रवाना झाली.श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यासाठी चंद्रकांत महात्मे,रवींद्र महात्मे, दिलीपराव माने,धनाजी आरगे,संतोष बन्ने,उत्तम पाटील,वसंत चुडमुगे,मोहन पुजारी,सुरज काळे यांच्यासह शिरोळ शहर सत्संग वारकरी सांप्रदाय व स्वामी समर्थ भक्तानी परिश्रम घेतले.