
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे आदेश मिळेल त्यानुसार आंदोलनाची दिशा असेल
अशी भूमिका येथील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने येथील पोलिस ठाण्याच्या बैठकीत दिला.मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने आंदोलनाची भूमिका जाणून घेण्यासाठी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस येथील पोलिस ठाण्यात मराठा आंदोलकांची बैठक घेतली.प्रारंभी फडणीस यांनी मराठा समाजाच्या प्रमुखांना आंदोलनाची शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले मात्र आंदोलकांनी आरक्षणासाठी समाजाची आर या पारची लढाई असून आंदोलनाबाबत जरांगे पाटील कोणता आदेश देतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे सांगितले.यावेळी वैभव उगळे, दयानंद मालवेकर,गोपाळ चव्हाण,विजय मोगणे,मिलिंद गोरे, अजित देसाई, गोवर्धन माने,संदीप अडसूळ यांच्यासह मराठा समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.