हेरवाड येथे शॉर्टसर्किटने सुमारे ३५ एकरहून अधिक ऊस जळून खाक

हेरवाड येथे ३५ एकरहून ऊस क्षेत्र जळून खाक
हेरवाड / प्रतिनिधी

शॉर्टसर्किटने हेरवाड सुमारे ३५ एकरहून अधिक ऊस जळून खाक

झाले आहे.दरम्यान देसाई मळ्यानंतर जमादार मळा या ठिकाणी अद्याप ऊस पेटत असल्याने अग्निशमन दलाच्या वतीने सदरची आग विझवण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शॉर्टसर्किटने परिसरातील ऊसाला आग लागली.आगिने बघता – बघता रौद्ररूप धारण केले.त्यामुळे परिसरातील सुमारे ३५ एकरहून अधिक ऊस क्षेत्र जळून खाक झाले आहे. सदरची आग ही जमादार मळा या ठिकाणी असलेल्या क्षेत्राला लागल्याने त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र जळत आहे. अग्निशमन दलाच्या वतीने सदरची आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.यामध्ये वसंतराव देसाई,रावसाहेब माने शंकर माने सुभाष उगारे दादा पाटील रावसाहेब पाटील, विजय पाटील, सचिन देबाजे, अजित उगारे, सुभाष देबाजे आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान, शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे महावितरण विभागाने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष स्नेहा वसंतराव देसाई यांनी केली आहे.

Spread the love
error: Content is protected !!