ऐन थंडीत वाढणारे आजार –
जुनाट सर्दी,ताप,आलेरजिक खोकला, न्यूमोनिया, दमा, ब्रॉनकायटिस, जळवात, संधिवात (Osteo Arthritis), आमवात (Rheumatoid Arthritis) कोरडी खाज, सायनूसायटिस, हार्ट अटॅक, पॅरालिसीस,नसांचे आजार, वात व्याधी हे आजार थंडीच्या मोसममध्ये बळावतात.यामध्ये घ्यावायची काळजी.
उपाय –
1) प्रवास करताना नाकाला मास्क लावावे जेणेकरून धूळ व हवेतील धातू कण, परागकण नाकावाटे शरीरात जाणार नाहीत त्यामुळे जुनाट सर्दी व ताप,आलेरीजिक खोकला वाढणार नाही. देशी हळद व तुलसीचा अर्क,त्यांच्यासाठी लाभकारी ठरेल
2) दररोज देशी गाईचे तूप 2 थेंब नाकात सोडावे ज्यामुळे नाक,घश्याचे इन्फेकशन होणार नाही.तसेच झोपेत घोरण्याचा त्रास देखील कमी होईल.
3)आंघॊळीपूर्वी तिळ तेलाची मालिश करावी व थोडा व्यायाम करून मग आंगोळ करावी जेणेकरून वात व्याधी, संधिवात, पॅरालिसीस लवकर बरा होईल.
4)अंघाला कुठलेही केमिकल सोप न लावता पंचगव्य /आयुर्वेदिक औषधी सोप वापरावे जेणेकरून कोरडी खाज कमी होईल व कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करावी
5) दमा, ब्रॉनकायटिस, न्यूमोनिया मध्ये छातीला व छातीच्या पाठीमागील बाजूस मोहरी तेल लावावे व शेक घ्यावा ज्यामुळे छाती भरली असेल तर ती हलकी होईल व श्वसनाला त्रास होणार नाही.
6) दही, ताक, वांगी, टोमॅटो, केळ,हरभरा ,पावटा, वरणा, बटाटा,फ्रिज मधील पदार्थ, कोल्ड्रिंक, दुधाचे जड पदार्थ, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पापड, लोणचे हे पदार्थ या दिवसामध्ये अपायकारक ठरतात.
7) पॅरालिसीस, संधिवात, नसांचे आजारामध्ये महानारायण तेलाची मालिश करावी व नंतर काळ्या वाळूचा शेक घ्यावा. व रात्री बजरंग लेप लावावा.
8) आमवात (Rheumatoid Arthritis )मध्ये तेलाची मालिश केल्याने आजार वाढतो त्यामुळे या आजारामध्ये फक्त वाळूचा शेक घ्यावा व रात्री बजरंग लेप करावा.
9) दमा, ब्रॉनकायटिस, न्यूमोनिया मध्ये भारंगी चूर्ण व गोमूत्र अर्क दररोज वापरावा.
10) सर्व वात व्याधी पॅरालिसीस, संधिवात, आमवात, नसांचे आजार या मध्ये सुंठ चूर्ण1चमचा व 1चमचा एरंडेल तेलाचे सेवन दररोज करावे
11) हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज मध्ये जवस व दालचिनी पावडर हे कायम घ्यावे, दालचिनी रक्त पातळ ठेवण्यास मदत करते तर जवस हे बॅड कोलेस्टे्रोल बर्न करते.
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
संपर्क -9175723404,7028612340