आरोग्यासाठी ‘सितोपलादी चुर्ण’चे फायदे एकदा पहाच

सितोपलादी चूर्ण हे खूप स्वस्त व खूप उपयोगी औषध आहे.हे सर्वांच्या घरी संग्रही असायलाच हवे.चवीला सुद्धा खूप छान आहे.बाजारामध्ये सितोपलादी चूर्ण सहज उपलब्ध आहे, आजकाल याच्या गोळ्यासुद्धा बाजारात आल्या आहेत. परंतु चूर्णच घ्यावे किंवा घरी सुद्धा तयार करू शकता. त्यातील घटकद्रव्ये खालीलप्रमाणे –

खडीसाखर – १६०ग्रॅम
वंशलोचन – ८० ग्रॅम
पिंपळी – ४० ग्रॅम
वेलची – २० ग्रॅम
दालचिनी – १० ग्रॅम
या प्रमाणामध्ये सर्व घटकद्रव्ये घ्यावे व चांगले मिसळून काचाच्या हवाबंद बरणीत भरावे.

सितोपलादी चूर्णाचे उपयोग –

सर्दी, खोकला, घशामधे खवखव असताना मधातून दिवसभरातून ४-५ वेळा याचे चाटण घ्यावे.
कोणत्याही प्रकारचा कफ सितोपलादी चूर्ण घेतल्याने कमी होतो.छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर कफ पातळ करून बाहेर काढते.अँटी बॅक्टेरियल व अँटी व्हायरल काम करते.

न्यूमोनिया, ब्राँकायटीस, टी बी, दमा यासारख्या श्वसन संस्थेच्या सर्व विकारामध्ये याचा उपयोग होतो
लहान मुलांना सर्दी, खोकला असल्यास सितोपलादी चूर्ण अल्प मात्रेत मधातून चाटवावे. (बाहेरचे कफ सिरप देण्याच्या भानगडीत पडू नये, लहान मुलांच्या कफ सिरप नी खूप मूल दगावल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत) सितोपलादी चूर्ण भूक वाढवते, अन्न पचण्यास मदत करते, पोटात गॅसेस होऊ देत नाही. तसेच सितोपलादी चूर्ण रोग प्रतिकार शक्ती वाढववते, हे एक प्रकारचे टॉनिक आहे.

मात्रा – १-२ ग्रॅम दिवसातून तीन वेळा मधासह.

(आवश्यकता वाटल्यास ४-५ वेळही घेऊ शकता)

 

Spread the love
error: Content is protected !!