योग्य निर्णय जिद्द आत्मविश्वास जोरावर यशस्वी होता येते : राज कदम
रोटरी क्लब हेरिटेज सिटीच्या वतीने पद्माराजे विद्यालयात मार्गदर्शन शिबिर
शिरोळ / प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या मनी आत्मविश्वास वाढवून योग्य निर्णय घेऊन जिद्द चिकाटी जोरावर कठोर परिश्रम घेऊन वाटचाल सुरू ठेवणे गरजेचे असते असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा सल्लागार राज कदम यांनी केले.शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांच्या सहकार्यातून व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्यावतीने येथील पद्माराजे विद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राज कदम हे बोलत होते.तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप भिंताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना राज कदम म्हणाले की आपण पारंपारिक सवयीचे गुलाम न होता आपल्या विचाराने निर्णय घ्यावेत वेळेचे काटेकोरपणे नियोजन करून काम करीत रहावे स्वप्न पाहताना आदर्श व्यक्ती विचारांची मोठी स्वप्न पाहून ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत आपल्या करिअर विषयी निवड करताना आपले स्वतःचे प्रखड मत आपणास माडता आले पाहिजे असा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करावा प्रत्येक कामात आपल्या अंगी उत्साह असला पाहिजे प्रबळ मानसिकता आणि आत्मविश्वास योग्य निर्णय घेण्याची क्षमता आदर्श व्यक्तींचे विचार आत्मसात करून परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपणास निश्चितच जीवनात यशस्वी होता येते असे मौलिक विचार त्यांनी अनेक हलके फुलके उदाहरण सांगत औघवत्या शैलीत मांडले यामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साह निर्माण झाला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप भिंताडे म्हणाले की आपले जीवन नेहमी च शिकत राहण्यासारखेच असते पण विद्यार्थी दशेतच योग्य मार्गदर्शन लाभले की आपले जीवन यशस्वी होते यामुळे प्रत्येकाने आदर्श विचार घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे योग्य ध्येय निश्चित करून मार्गक्रम केल्याने आपण यशस्वी होऊ शकतो असे सांगितले.शिरोळ क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे इव्हेंट चेअरमन प्रा.के.एम.भोसले यांनी स्वागत व प्रस्ताविक केले सदस्य परशुराम चव्हाण यांनी आभार मानले. चंद्रकांत भाट यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी रोटरी हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी तुकाराम पाटील,सदस्य डॉ.अतुल पाटील,राहुल माने,पद्माराजे विद्यालयाचे उपप्राचार्य तुकाराम गंगधर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.