१९ डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश संघटक मोबिन मुल्ला
यांनी सांगितले.यावेळी मुल्ला म्हणाले सर्वात जास्त भ्रष्टाचार हा शिक्षण आणि आरोग्य विभागातच होतो.शासन निर्णयानुसार,शासन नियमानुसार कोट्यावधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे हे दाखल झाले पाहिजेत शिवाय गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे शासनाचा अनुदान लाटणाऱ्या शैक्षणिक संस्थेची मान्यता रद्द करावी.तसेच कर्तव्यात कसुरी,शिस्तभंग,दप्तर दिरंगाई व फसवणूक असे गुन्हे माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांच्यावर झाले पाहिजेत.असे मुल्ला यांनी सांगितले.