नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य – आमदार राजेंद्र यड्रावकर

नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य : राजेंद्र यड्रावकर

शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग परिषदेचे उदघाटन

यड्राव / प्रतिनिधी

संगणकातील प्रगत तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या संशोधन कल्पना मांडण्यासाठी परिषदेत संशोधक एकत्र येतात. आपण सर्वांना आम्हाला तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी शोधून काढायच्या आहेत. ज्या आपल्याला व समाजाला उत्कृष्ट बनविण्यात मदत करू शकतील.या परिषदेचा प्रत्यक्ष परिणाम आणि त्यातून जगाला फायदा मिळेल यावर लक्ष केंद्रित करूया.नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य आहे आणि त्यातूनच आपण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी कल्पिलेला भारत साकार करू शकतो.’ असे प्रतिपादन श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अध्यक्षस्थानावरुन केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १३ व्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या विषयावर परिषदेच्या उदघाटनावेळी बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थीत संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.केतन कोटेचा म्हणाले,‘एक शिक्षण संस्था काय करु शकते,याच उदाहरण म्हणजे शरद इन्स्टिट्युट आहे.अगदी कमी कालावधीत संस्थेने यशाची सर्व सीमा पादक्रांत केली आहेत.ऑस्ट्रेलिया येथील सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी डॉ.मिना झा म्हणाल्या,‘आता संगणकाधिष्ट नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहे.त्याचे ज्ञान अवगत करुन समाजासाठी उपयोगात आणणे हे आपले काम आहे.या परिषदेतून हे उद्दीष्ट आपल्याला साध्य करता येईल.मलेशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अॅम्प्टनच्या डॉ. सागाया म्हणाल्या,‘कॉम्प्युटींग या तंत्रज्ञानाने अवघे विश्व व्यापले आहे.त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.या विषयावर जगभरातून आलेले शोधनिबंधातून सकारत्मक गोष्टी मिळतील.डॉ.उमेश राव म्हणाले,आर्टीफिशल इंटेलिजेन्स हे तंत्रज्ञान आता जगासमोर आले आहे.त्याचा वापर व त्यातील बारकावे आणि त्यामधील संशोधनयाविषयी चर्चा आपण या परिषदेत करणार आहोत.या परिषदेसाठी यूएसए, चीन,पोलंड,सौदी अरेबिया यासह जगभरातून २५० शोधनिबंध आले आहेत. स्वागत IACC कॉन्फरन्सचे जनरल सहअध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. धनश्री बिरादार व प्रा.कल्याणी बेडेकर यांनी केले.आभार प्राचार्य डॉ.एस.ए.खोत यांनी मानले.यावेळी परिषदेचे संयोजक डॉ. गोविंगसिंग पटेल व प्रा.कौस्तुभ शेडबाळकर यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,डिन,प्राध्यापक,संशोधक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
Spread the love
error: Content is protected !!