“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौरांचा प्रशासनाला सवाल

सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार सांगली / प्रतिनिधी  सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची संयुक्त बैठक पार पडली.या बैठकीत शहरातील मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, उद्याने आणि स्वच्छता या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली.महायुतीच्या माध्यमातून … Read more

सांगली फाटा येथील रद्दीच्या गोडाऊनला आग,लाखो रुपयांचे नुकसान! माल वाहतूक टेंम्पो जळून खाक

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक असणाऱ्या रद्दी च्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रदीपकुमार अँड कंपनी नावाने संदीप घोरपडे व प्रदीप घोरपडे यांचे रद्दीचे गोडावून आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदी रद्दीचा साठा होता.मंगळवारी पहाटे … Read more

जि.प. शाळा स्मार्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

शिरोळ / प्रतिनिधी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अधिक सक्षम व आधुनिक बनवण्यासाठी त्या ‘स्मार्ट शाळा’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना शाळांच्या भौतिक सुविधाही तितक्याच सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिरोळ येथील राजाराम विद्यालय क्र. २ मध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व … Read more

राजा प्रधान यांच्या ‘हालगी’ एकपात्री लोकनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; धमाल विनोदी प्रयोगाने सांगलीकर मंत्रमुग्ध

सांगली / प्रतिनिधी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जेष्ठ कलाकार राजा प्रधान यांच्या ‘हालगी’ या एकपात्री लोकनाट्याच्या प्रयोगाला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्कृष्ट अभिनय,सुरेल संगीत-गायनाची साथ आणि ग्रामीण बोलीतील खुसखुशीत विनोदामुळे रंगलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक वेगळी सांस्कृतिक मेजवानी ठरला. हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत समाजातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या या प्रयोगाने उपस्थितांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडले. … Read more

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगली विकासावर सकारात्मक चर्चा

हुपरी / प्रतिनिधी  हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगली महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट होऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.हा सोहळा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न राहता सांगली शहराच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा संवादाचा मंच ठरला.या प्रसंगी सांगली महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात तसेच … Read more

फैजाने गरीब नवाज फौंडेशनतर्फे रमजान किट वाटप कार्यक्रम संपन्न

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुलाची शिरोली येथे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू व विधवा महिलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने फैजाने गरीब नवाज फौंडेशनतर्फे धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना रमजान महिन्यात दिलासा मिळाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद … Read more

अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर कॉ.आप्पा पाटील यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

अब्दुल लाट / प्रतिनिधी  अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीवरील पाणीपुरवठा योजनेतील कथित गैरप्रकार, बेकायदेशीर हस्तांतरण आणि ग्रामस्थांना होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात कॉम्रेड आप्पा पाटील यांनी आज सकाळपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. अब्दुल लाट गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त … Read more

श्री भैरेश्वर मूर्ती वज्रलेप सोहळ्यासाठी लोकवर्गणीचा शुभारंभ

शिरोळ / प्रतिनिधी  शिरटी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर श्री भैरेश्वर देवाच्या मूर्तीचा वज्रलेप महापेहरावा, महायज्ञ व महाप्रसाद सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने श्री भैरेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटी शिरटी यांच्या वतीने मंदिर परिसरात नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत धार्मिक सोहळ्यासाठी लोकवर्गणी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.बैठकीत श्री भैरेश्वर … Read more

पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी कॉ आप्पा पाटील यांचे आमरण उपोषण सुरू

अब्दुल लाट / प्रतिनिधी दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील कथित त्रुटी आणि कामातील अनियमिततेविरोधात गावकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत असून या प्रश्नावर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून या पाणीपुरवठा योजनेतील … Read more

गोकुळच्या ६३ व्या वर्धापनदिनी ‘गोकुळ आईस्क्रीम’चे लोकार्पण; दूध संकलन २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

कोल्हापूर / प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चा ६३ वा वर्धापन दिन गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या विशेष कार्यक्रमात ‘गोकुळ आईस्क्रीम’ या नव्या उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.तसेच ‘गोकुळश्री’ स्पर्धा व विविध बक्षीस वितरण कार्यक्रमही पार पडले. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी … Read more