कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विरोधात राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नसल्याचे खंत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची बाजू मांडताना, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली.तसेच राज्यातील ऊस उत्पादक … Read more

‘या’ राशी होणार मालामाल,९ डिसेंबर राशी भविष्य

मेष -आजचा दिवस शुभ,मोठा फायदा होईल.चांगल्या वागणुकीने लोकांची मने जिंकू शकाल.जोडीदाराची तब्येतीची काळजी घ्या,धावपळ करावी लागू शकते. वृषभ -आज आर्थिक लाभ मिळेल,आजचा दिवस आनंदात जाईल.चांगली बातमी मिळेल आरोग्याची काळजी घ्या,आज काम आणि खर्च या दोन्ही वाढणार. मिथुन -अनेक दिवस रखडलेली कामे आज पूर्ण होणार,वरिष्ठांकडून बक्षिस मिळेल.फालतू खर्च टाळा.गाडी चालवताना काळजी घ्या,पैसे खर्च होतील, कर्क -आज … Read more

निमशिरगाव येथे स्वदेशी प्रेरणा दिनाचे आयोजन

जयसिंपुर / प्रतिनिधी स्वदेशी,स्वावलंबन आणि स्वाभिमानी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणारे वैज्ञानिक,स्वदेशी चळवळीचे प्रखर कार्यकर्ता व वक्ता,आजादी बचाओ आंदोलना तसेच भारत स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक राष्ट्रीय सचिव व मेकॉले शिक्षणपद्धती,ब्रिटिश न्याय व्यवस्थांच्या दुष्परीणामांची व महर्षी वाग्भट रचित अष्टांग हृदयं आणि अष्टांग संग्रहम,देशी गाय,नैसर्गिक शेती,विदेशी काळाधन,भोपाळ गॅस हत्याकांड बद्दल समाजमध्ये सर्व प्रथम माहिती देणारे व जागृती आणणारे … Read more

दत्तवाड केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सुभाष कुरुंदवाडे यांचेकडे

दत्तवाड / प्रतिनिधी प्रशासकीय कामाचे सोईचे दृष्टीने केंद्रप्रमुखपदाचा पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार मराठी विद्या मंदिर नवे दानवाडचे अध्यापक सुभाष आण्णाप्पा कुरुंदवाडे यांचेकडे नुकताच दिला गेला.मावळते केंद्रप्रमुख रमेश शंकर कोळी यांचे हस्ते त्यांचा सत्कार कन्या विद्या मंदिर घोसरवाड येथे करण्यात आला.याप्रसंगी हिंदुराव फासके, रमेश मारुती कोळी,सहदेव माळी,बाळासाहेब कांबळे,गुंडा परीट,ज्योती परीट,दिलीप शिरढोणे उपस्थित होते.केंद्रसमन्वयक … Read more

अब्दुललाट गुरुकुलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ

अब्दुललाट /प्रतिनिधी गुरुकुल शिक्षण समूह येथे वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली.डॉजबॉलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वीकार हारगुले याच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून गावातील दत्त मंदिरातून क्रीडांगणावर आणण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मैदानी खेळांना खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी झटले पाहिजे,देशाप्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे.असे प्रतिपादन … Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे इचलकरंजीत पडसाद

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे.कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे,असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यविरोधात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी भाजपा युवा मोर्चा … Read more

इथेनॉल निर्मितीवर बंदी घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम – सचिन शिंदे

कुरुंदवाड – प्रतिनिधी सुरेश कांबळे भारतीय बाजारपेठेमध्ये साखरेचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.एकीकडे शेतकऱ्यांना एकरी ऊस उत्पादनासाठी एक लाख रुपये खर्च येत आहे शेतकऱ्यांना ऊस शेती परवडना आंदोलन करून दर मागावा लागत आहे.त्यामुळे उसाचे उत्पादन भविष्यात कमी होणार आहे.यावर धोरणात्मक निर्णय घेणे ऐवजी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका … Read more

स्वाभिमानीकडून केंद्र सरकारच्या इथेलॉन बंदी आदेशाची होळी

केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करणेचा आदेश काढला आहे.यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच तसेच या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतुन मिळणारे अधिकचे उत्पन्न मिळणार नाही. त्याचा परीणाम अंतीम ऊस दरावर होणार आहे.या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधार्थ नांदणी येथील गांधी चौकात केंद्राचा आदेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाआघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे … Read more

कुरुंदवाड येथे बौद्ध समाज मालकीच्या जागेत सांस्कृतिक भवन बांधण्यास विरोध

पालिकेने सांस्कृतिक भवन बांधण्याचा ठराव तात्काळ रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : बौद्ध समाज बांधव कुरुंदवाड – प्रतिनिधी सुरेश कांबळे कुरुंदवाड येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या गट क्रमांक 127 मधील जागेत पालिकेने सांस्कृतिक भवन बांधण्याचा ठराव केला आहे. हा दलित समाजावर अन्याय करणारा आहे.या संस्कृतीक भवन ठराव आणि उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा. अन्यथा तीव्र … Read more

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील पोर्चचे काम अंतिम टप्प्यात

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मिळणार सुलभ नृसिंहवाडी / प्रतिनिधी येथील दत्त देवस्थानचा महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून तीर्थक्षेत्राचा उल्लेख आवर्जून केला जातो.या तीर्थक्षेत्रावर दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांना सोई सुविधा वाढवणेही गरजेचे आहे. दरम्यान एका भाविकांच्या मदतीतून दत्त देवस्थान ट्रस्टने मंदिरासमोरील प्लॅटफॉर्मचे(पोर्च)विस्तारित करण्याचे काम हाती घेतले आहे.सुमारे दोन कोटीहून अधिक रकमेचे … Read more