राज्याच्या सर्वोच्च ‘वसंतराव नाईक शेतीमित्र’ पुरस्काराने कृषीतज्ञ प्रवीण माळी सन्मानित 

पर्यावरणपूरक व रासायनिकमुक्त शेतीतील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल; राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत सन्मान शिरोळ / प्रतिनिधी  शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रासायनिकमुक्त शेतीच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिरोळचे सुपुत्र तथा कृषीतज्ञ प्रवीण माळी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२३’ ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील … Read more

शिरोळ शहर मेकॅनिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाळासो कोळी,उपाध्यक्षपदी मुकूंद लोंढे; नव्या कार्यकारिणीकडून मेकॅनिकांच्या प्रगतीचा संकल्प

शिरोळ | प्रतिनिधी शिरोळ शहर मेकॅनिक असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासो कोळी यांची, तर उपाध्यक्षपदी मुकूंद उर्फ बंडू लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी राजाराम कोगले, तर खजिनदारपदी अजय सावंत यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शहरातील मेकॅनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या माध्यमातून सर्व मेकॅनिकांच्या … Read more

पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली जवळील महाडिक पेट्रोल पंपसमोर विचित्र अपघात ट्रक व सफारी कारचे मोठे नुकसान

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील महाडिक पेट्रोल पंपसमोर आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एक ट्रक आणि टाटा सफारी कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय … Read more

हेरवाड येथील श्री हालसिद्धनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात; १० लाखांचा निधी मंजूर

हेरवाड / प्रतिनिधी हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा बुधवारी धार्मिक वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंदिर परिसरात सकाळी विधीवत पूजा, कलश … Read more

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त साखरकडून प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान, नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केला गौरव

शिरोळ / प्रतिनिधी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील प्रगत, प्रयोगशील व नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला.उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी … Read more

कृषी दिनानिमित्त शिरोळ पंचायत समितीत वृक्षारोपण; प्रगतिशील शेतकऱ्यांचा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते गौरव

शिरोळ / प्रतिनिधी  कृषी दिनानिमित्त शिरोळ पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर कृषी उत्पादनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी बांधवांचा सत्कार हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि … Read more

आ.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या हेरवाडात वह्या वाटप

हेरवाड / प्रतिनिधी  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्यात आले. तर ग्रामपंचायत हेरवाड यांचेकडून शाळेला संविधानाची प्रत भेट देण्यात आली.सूत्रसंचालन दिलीप शिरढोणे यांनी केले.याप्रसंगी युनुस जमादार, सरपंच सौ.रेखा जाधव यांची मनोगते झाली. याप्रसंगी अब्दुललाट ग्रामपंचायतचे सदस्य … Read more

‘विनाअपघात सेवा हीच खरी चालकाची ओळख’ – अनिलराव यादव,२७ वर्षांची विनाअपघात सेवा पूर्ण करून एसटी चालक बाबासाहेब जमादार सेवानिवृत्त

‘विनाअपघात सेवा हीच खरी चालकाची ओळख’ – अनिलराव यादव,   २७ वर्षांची विनाअपघात सेवा पूर्ण करून एसटी चालक बाबासाहेब जमादार सेवानिवृत्त   कुरुंदवाड आगारात सत्कार समारंभ शिरोळ / प्रतिनिधी   प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तब्बल २७ वर्षे विनाअपघात सेवा बजावून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुरुंदवाड आगारातील चालक बाबासाहेब (बाबासो मुसा) जमादार हे ३० जून … Read more

रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून डॉक्टर डे व कृषी दिन उत्साहात; डॉक्टर व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

शिरोळ / प्रतिनिधी  रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर डे आणि कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाच्या आरोग्य आणि अन्नसुरक्षेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शहरातील डॉक्टर तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.या उपक्रमामुळे समाजातील दोन महत्त्वाच्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. येथील टारे सभागृहात बुधवारी आयोजित कार्यक्रमाला विविध … Read more

शाहुवाडीतील शाखा अभियंता ३८ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

शाहुवाडी / प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग, शाहुवाडी येथील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) याला ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोल्हापूर पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून शाहुवाडी पोलीस ठाण्यात आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम … Read more