अर्जुनवाड / प्रतिनिधी
अर्जुनवाड ता.शिरोळ येथील कृष्णा नदी पात्रामध्ये आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे.सदर मृतदेहाची ओळख पटली नसून याबाबतची वर्दी अर्जुनवाडचे पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी शिरोळ पोलिसात दिली.शनिवारी सकाळी येथील कृष्णा नदी पात्रात दिनकरराव यादव पुलाजवळ स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना नागरिकांना निदर्शनास आले.अर्जुनवाडचे पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी माहिती घेऊन याबाबत शिरोळ पोलिसांना वर्दी दिली.सदर मृतदेह अंदाजे ३५ ते ४० वर्षाचे असून अंगावर गुलाबी रंगाचा कुडता,काळी लेगीज पोशाख परिधान केलेला आहे. यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनसाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश शिंदे,पोलीस उपनिरीक्षक शहाजी बंडगर,पोलीस हवालदार राजाराम पाटील,पोलीस नावजी पाटील,सरपंच नंदाताई खोत,माजी उपसरपंच हेमंत कांबळे,वजीर रेस्क्यू फोर्सचे दशरथ शिकलगार,देवा शिकलगार,शिवराज सोनार यांनी मृतदेह बाहेर काढला. पंचनाम्यानंतर मृतदेह शिरोळ पोलिसांच्या ताब्यात दिला. शिरोळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे.