“अंकुशच्या लढ्याला मोठं यश” टाकळी-चंदुर पुलाचा भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Spread the love

सैनिक टाकळी / प्रतिनिधी

 

कर्नाटक सरकारकडून कृष्णा नदीवर सैनिक टाकळी चंदुर पुलाचे बांधकाम 2014 पासून सुरू आहे.सदर पूलाचे बांधकाम महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांचे कोणतेही भूसंपादन न करता कर्नाटक सरकार कडून सुरु होते.
त्यामुळे आंदोलन अंकूश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सदर पुलाचे बांधकाम बंद पाडले.  तसेच आपल्या भागात येणार्या महापुरास पुल, पुलाचे भराव कारण आहेत.त्यामुळे पुलास भरावा ऐवजी कमानी कराव्यात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भुसंपादित जमिनीचा मोबदला देऊन पूल बांधण्यास चालू करावे असे दोन्ही राज्याच्या महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व  शेतकऱ्यांच्या मध्ये ठरलेल होत.आंदोलन अंकुश संघटनेच्या मागणीनुसार पुलाच्या वर्क्स ऑर्डर मध्ये बदल करून कमानी करण्याचा नव्याने आराखडा करण्यात आला.तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून आज पासून मोबदला खात्यावर करण्यास सुरुवात करण्यात आली सुदीपकुमार बाबासो पाटील,अनिल दत्तात्रय पाटील,या शेतकऱ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिली.या भूसंपादन प्रक्रियेसाठी माजी खासदार प्रकाश अण्णा हुकेरी, केआरडीसीएलचे अभियंता रिजवान, चंदुरचे सरपंच अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पंचायत समिती बांधकाम विभाग उपाभियंता श्री बदडे,कनिष्ठ अभियंता श्री घोडके,पुलाचे वर्क सुपरवायझर अनिल कुमार साखरे अजय पाटील सुरेश गायकवाड,रघुनाथ गुरुजी,संजय चौगुले, महेश जाधव, संपत मोडके इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!