दत्तवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यातील नागरिकांच्या सोयीची ठरलेली दत्तवाड चिकोडी एसटी बस गेली दोन वर्षे बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार तसेच जेष्ठ नागरिकांची मोठी
गैरसोय होत असल्याने दत्तवाड- चिक्कोडी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी सीमाभागातून होत आहे.
दत्तवाड ता.शिरोळ येथील नागरिकांचा सीमाभागातील कर्नाटकशी विविध कारणातून होत असतो.महाराष्ट्र व कर्नाटकातील विद्यार्थी,नोकरदार,व्यवसायिक,शेतीमाल शेजारी असणाऱ्या चिकोडी शहरात घेऊन ये-जा करत असतात.
कर्नाटक महामंडळाची एसटी बस संध्याकाळी आठ वाजता चिकोडी येथील बस स्थानकावरून सुटणारी बस दत्तवाड येथे मुक्कामी असायची व सकाळी सहा वाजता दत्तवाड येथून परत चिकोडीला जात होती.
या बसमुळे एकसंबा,चिक्कोडी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना,नोकरदार,जेष्ठ नागरिकांना सोईचे ठरत होते.तसेच सकाळी एसटी बस असल्याने कर्नाटकात बेळगाव हुबळी व इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवासांना ही सकाळची बस फायदेशीर होत होती.
मात्र गेली दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात बंद झालेली एसटी बस अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने विद्यार्थी व प्रवासांची गैरसोय होत आहे.त्यामुळे कर्नाटकच्या लोकप्रतिनिधीनी दत्तवाड- चिकोडी बस सुरू करून सीमाभागातील नागरिकांची गैर सोय टाळावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.