ऐतिहासिक शिरोळ नगरीतील ‘लाल मातीतील कुस्ती’जिवंत ठेवणारे पैलवान पै मज्जिद हुसेनसो अत्तार

शिरोळ / सचिन उर्फ शशिकांत पवार

ऐतिहासिक शिरोळ नगरीत श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासूनच इथल्या मातीत अनेक प्रकारचे मैदानी खेळ खेळले जायचे,या ग्रामीण गावात त्याकाळी काही मोजक्याच तालमी अस्तित्वात होत्या.

अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीचा भाग म्हणून कुस्ती या खेळाकडे पाहिले जायचे मैदानातल्या लाल मातीवरही रोमांच उमटवणारा असा हा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती आणि याच खेळाने या काळातील काही तरुणांना कुस्तीने वेड लागले होते.

अशाच काही तरुणांच्यातील एक तरुण म्हणजे आपल्या शिरोळ नगरीचे सुपुत्र पैलवान मज्जिद हुसेनसो अत्तार शरीर संपत्ती हीच आपली धनसंपत्ती”या म्हणीप्रमाणे सदृढ शरीर बनवण्यासाठी निरोगी आरोग्यासाठी खाऊन पिऊन मस्तपैकी व्यायाम करायचा

शरीर कमवायचे आणि अशा विचारातूनच शिरोळ मधील कुरणे तालीम येथे कसरतीसाठी पैलवान मज्जीद चाचा यांना पाठवण्यात आले.घरातील सर्वच कुटुंबीयांनी यांना या पैलवानकीसाठी प्रोत्साहन दिले.

तशी परिस्थिती नसतानाही तंदुरुस्त तब्येतीसाठी पैलवानी खाना,खारीक,बदाम,काजू,दूध असा खुराक यांना कधीही कमी पडू दिला नाही.वडील बंधू पैलवान गणीसाहेब यांचेकडून मज्जिद चाचा यांनी लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू घेतले.

याचबरोबर बुद्धीची ही मशागत करण्यासाठी त्यांना गुरुवर्य जी.के पाटील सर यांनी ज्ञानदानाबरोबरच मन मनगट आणि मस्तक मजबूत आणि तंदुरुस्त होण्यासाठी कुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.

यानंतर पैलवान मज्जिद आत्तार यांनी शालेय जीवनापासूनच कुस्तीच्या आखाड्यात शड्डू मारण्यास सुरुवात केली.अनेक ठिकाणी कुस्ती जिंकून अनेक पारितोषिक बक्षीस आणून शिरोळ नगरीचे नाव लौकिक केले.

भविष्यात एक मोठा कुस्तीगीर पैलवान व्हावा यासाठी तालमीतील काही ज्येष्ठ मंडळी आणि यांच्या परिवारातील नातलगाणी पै.मज्जिद अत्तार यांना कोल्हापूरातील प्रसिद्ध पैलवान सातारकर वस्ताद यांच्या “मठ तालमी” मध्ये कुस्तीचे धडे घेण्यासाठी घातलं.

याठिकाणी पैलवान म्हणून तयार होऊन जिल्हास्तरीय, ग्रामीण भागातील अनेक कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्त्यांचे मैदाने मारली.बदलत्या युगाप्रमाणे तालमी ओस पडलेले पाहून आपले सहकारीमित्र पै.रावसाहेब देसाई,

पै.प्रकाश गावडे,पै.नंदू सुतार,पै.आप्पासाहेब कदम अशा अनेक पैलवान मित्रांच्या साथीने सन १९८८ साली शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषद”स्थापन केली.आणि या कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून

शिरोळ नगरीमध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे बिजली मल्ल पैलवान संभाजीराव पवार व पैलवान हरिश्चंद्र बिराजदार अशा नामवंत पंचांच्या समवेत भव्य कुस्ती मैदान आयोजित केले.सध्याच्या इंटरनेटच्या युगात तांबड्या मातीतील कुस्ती ग्रामीण भागातील कुस्ती जिवंत राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Spread the love
error: Content is protected !!