सदलगा नगरपालिकेच्या ‘त्या’ चार प्रभागाची निवडणुक जाहीर

Spread the love


सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम

चिकोडी तालुक्यातील सदलगा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५,१२,१५ आणि १६ या चार प्रभागातील निवडणुकीची अधिसूचना कर्नाटक राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची

अधिसूचना जाहीर करण्याची आहे.उमेदवारी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर अर्जाची छाननी १६ डिसेंबर असून उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख १८ डिसेंबर आहे.मतदान दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येणार असून, प्रसंगी फेर मतदान घेण्यासाठी २९ डिसेंबर रोजी

सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत सुचित करण्यात आले आहे.
तालुका केंद्रात ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर करण्यात येईल असे वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज प्रसिद्धी पत्रकात दिले आहे.

error: Content is protected !!