शिरोळच्या धाकल्या पाटलांचा “पाना” कुणाचा काटा ढिल्ला करणार ?

Spread the love

धरणगुत्ती / संभाजी जाधव 

शिरोळ विधानसभेच्या मैदानात तिन पाटलांत लढत आहे.जांभळीच्या थोरल्या पाटलांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.यड्रावच्या साहेब पाटलांनी आपले पत्ते अजून उघडले नाहीत.शिरोळच्या धाकल्या पाटलांनी जांभळी आणि यड्रावच्या पाटलांना प्रचारातून घाबरं घालायला सुरुवात केली आहे.जांभळीचे थोरले पाटील आणि यड्रावचे पाटील यां दोघांत मुख्य लढतीचे संकेत आहेत.पण शिरोळच्या धाकल्या पाटलांचं निवडणूक चिन्ह असलेला “पाना” मुख्य लढतीतल्या दोघांपैकी निकालादरम्यान कोणत्या पाटलांचा काटा ढिल्ला करणार? कि स्वाभिमानीची जय -विरु ची जूनी जोडी नव्याने मैदान मारणार ? याबाबत मतदारांत कमालीची उत्सुकता आहे.बाकी दोन गब्बर कारखानदारांना आता स्वाभिमानीचे जय -विरु भिडले आहेत.याचे बाकी सामान्य मतदारांत कौतूक आहे.

error: Content is protected !!