महावितरण वीज लाइन्स स्टाफ बचाव समितीचे आमदार राजेश पाटील यांना निवेदन

चंदगड / प्रकाश ऐनापुरे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विज लाईन स्टार बचाव कृती समिती यांच्यामार्फत दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पासून आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आलेली होती याचाच भाग

म्हणून कंपनीचे सिम कार्ड जमा करणे सर्व प्रकारची वसुली बंद करणे वैयक्तिक सर्व प्रकारचे वाहन वापरणे बंद करणे वाहनांना काळे झेंडे लावणे यासारखे आंदोलनाचे टप्पे पूर्ण झालेले असून

दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड आक्रोश मोर्चा व एक दिवसाचे धरणे आंदोलन नियोजित केलेले आहे तदनंतरही काही न फरक पडल्यास दिनांक १२ डिसेंबर

२०२३ पासून रिजनल डायरेक्टर ऑफिस औरंगाबाद येथे बेमुदत आमरण उपोषण नियोजित केले आहे.सदरील आंदोलनाची रूपरेषा आमदार राजेश पाटील यांना सांगून

याबाबत निवेदन देण्यात आले तर यावेळी आमदार राजेश पाटील यांच्याकडून सदरील प्रश्न विधानसभेमध्ये घेणेबाबत सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले.सदरचे निवेदन देण्याकरता चंदगड विभागातील सर्व कर्मचारी एक एकत्रित आलेले होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या
१. महावितरण मधील वर्ग ४ नोकरीतील शैक्षणिक आहारतेनुसार लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग तीन मध्ये वर्गीकरण करण्यात यावे
२. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे.
३. महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी यांना मागील पगार वाढ करारात नमूद असल्याप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भत्ता २०लिटर देण्यात यावा.
४. महावितरण कंपनीतील लाईन्स स्टॉप यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी
५. वसुली हे संगीत काम स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
६. सुरक्षित साधने व लाईन मेंटेन करता योग्य ते साहित्य पुरवण्यात यावे.
७. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती न करता सरळ सेवा भरतीने नोकर भरती करण्यात यावी या व्यतिरिक्त प्रत्यक्ष चर्चेत लाईन्स स्टाफ यांच्या काही मुद्द्यावर /समस्यावर निराकरण करण्यात यावे.

Spread the love
error: Content is protected !!