बनावट नोटांचे रॅकेट प्रकरणी दोन संशयित ताब्यात
एनआयएच्या पथकाची कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई
पुलाची शिरोली : कुबेर हंकारे
देशभरात काही ठिकाणी बनावट नोटा तयार करणारे एक मोठे रॅकेट कार्यरत झाले असून या संदर्भात २४ नोव्हेंबरला एनआयए इकडे एक तक्रार दाखल झाली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने
राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या पथकाने महाराष्ट्र,उत्तर प्रदेश बिहार आणि कर्नाटकात काही ठिकाणी छापेमारी केले. शनिवारी पहाटेच्या सुमारास पुलाची शिरोली व नागाव या दोन
ठिकाणी छापेमारी करत राहुल पाटील आणि जावेद देसाई या दोन संशतीताना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर आणि काही
कागदपत्र तसेच बनावट सिमकार्ड जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.मात्र या कारवाई विषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईबद्दल
स्थानिक पोलिसांना देखील फारशी माहिती नाहीय.अचानक झालेल्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.बनावट नोटा तयार करून बाजारात खपवणारे दोन रॉकेट गेल्या
वर्षभरात जिल्ह्यात उघडकीस आले होते.आज थेट एनआयएच्या कारवाईने जुन्या रॉकेट मधील संशयीत सहभाग असल्याचेही शक्यता नाकारता येत नसल्याचे वर्तवले जात आहे.एनआयए
च्या पथकाकडून कारवाई दरम्यान स्थानिक पोलिसांनी
मदतीसाठी बंदोबस्त पुरवला.मात्र एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई बाबत कोणतीही माहिती दिली नाही.