दानोळीच्या हलगी स्पर्धेत गारगोटीच्या अक्षयची हालगी कडाडली

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

दानोळी येथील प्रसिद्ध हलगी सम्राट कै.कल्लूराव तिवडे यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने व बबलू (भाऊ)धनपाल तिवडे याच्या प्रयत्नातून हलगी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या,

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील हालगी वादकांनी स्पर्धेत भाग घेतला.या कार्यक्रमाचे स्वागत राजू तिवडे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुनिता वाळकुंजे या होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन आदित्य पाटील यड्रावकर यांनी केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै.कल्लूराव तिवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली,प्रथम क्रमांक अक्षय आवळे गारगोटी, द्वितीय क्रमांक सुमित वायदंडे,मळगे बुद्रग,तृतीय क्रमांक युवराज गायकवाड पाचगाव

यांनी पटकावला,तर सौरभ आदमाने यड्राव व किशोर यादव बारवाड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला या कार्यक्रमचे आभार अध्यक्ष अजय आवळे यांनी मानले.

error: Content is protected !!