कोल्हापूर येथे आदर्श फाउंडेशनतर्फे मान्यवरांच्या हस्ते शिंदे यांना पुरस्कार प्रदान ; सामाजिक कार्याचा गौरव
शिरोळ / प्रतिनिधी
येथील माजी उपनगराध्यक्षा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलाबाई कृष्णराव शिंदे यांना आदर्श फाउंडेशन संस्थेच्या वतीने पर्सन ऑफ द इयर आदर्श समाजसेविका हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दरम्यान,महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे.
महिला सक्षमपणे कर्तबगारी सिद्ध करीत आहेत . समाजाप्रती केलेल्या सामाजिक कार्याच्या दखल घेऊन माझा सन्मान झाला याविषयी आनंद वाटतो.आदर्श फाउंडेशन संस्था विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचे काम करीत असून फाउंडेशनचे हे कार्य प्रेरणादायी आहे असे मत माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृह येथे झालेल्या समारंभात कोल्हापुरी फेटा,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन माजी उपनगराध्यक्षा शिंदे यांचा गौरव करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख योजना पाटील (येलूर) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशोगाथा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास सोलापूरच्या सामाजिक न्याय प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे , राज्य निरीक्षक दिपाली लोहार, पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघटना अध्यक्ष प्रदीप माने पाटील,शाहू साखर कारखान्याच्या संचालिका रेखाताई पाटील,सावर्डे बुद्रुकचे माजी सरपंच प्रताप पाटील,माजी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमन भगवानराव साळुंखे ,
अभिनेते डॉ दगडू माने,निवेदिता शिंदे,हर्षवर्धन शिंदे,
स्नेहल शिंदे,अमरसिंह शिंदे,शिल्पा महात्मे,अश्विनी माळी, संजय भोसले,संजय काटे यांच्यासह आदर्श फाउंडेशनचे प्रमुख विजय लोहार,कार्यवाह वनिता लोहार आदि मान्यवर उपस्थित होते.प्रा गंगाराम सातपुते यांनी स्वागत केले.अभिनेते श्रीनिवास कळसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्वरी देशपांडे यांनी केले.