नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची आरोग्य तपासणी शिबिर
नांदणी / प्रतिनिधी
लहान मुलांचा आहार व विहार या दोन गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून आईचे दूध हाच सर्वोत्तम आहार आणि औषध आहे.आपल्या शिरोळ तालुक्यात कुपोषणाचा आकडा सर्वाधिक असून तो कमी करण्यासाठी सर्वांनीच भारतीय संस्कृतीच्या आहाराचा अवलंब करणे गरजेचे आहे.चॉकलेट,गोळ्या,बिस्किट, कुरकुरे व बाहेरील तेलकट पदार्थच आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत असून या सर्व गोष्टींपासून दूर रहाणेच उत्तम आहे.
भविष्यात बाळ सुदृढरित्या टिकवायचे असेल तर आडमिट करण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे.बदलत्या काळात लहान मुलांना टी.व्ही. व मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे हि आज काळाची गरज बनली आहे.असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ अतुल पाटील यांनी केलेग्रामपंचायत नांदणी, कोपिअस हेल्थकेअर, रोटरी कलब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ,प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी आणि विद्यमान डॉक्टर्स हया सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथे मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक च्या माध्यमातून ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.यावेळी अतुल पाटील हे बोलत होते.
सरपंच सौ. संगीता तगारे,नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.शर्वरी इंगळे,रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे खजिनदार संजय शिंदे व सदस्य तसेच ज्येष्ट पत्रकार चंद्रकांत भाट,पत्रकार राजीव कुचकर,सुनील क्षिरसागर,अमोल पाटील,कॉपीयस हेल्थ केअरच्या वतीने सौ मीनाक्षी सुतार,सुमित पाटील,राकेश लांबे तर मातोश्री चाईल्ड क्लिनिकमधील सौ प्राजक्ता कुरणे,श्री फारुख मोमीन,कु दिक्षा गंगधर,अफताब कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली.
प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अतुल पाटील यांनी बालकांची आरोग्य तपासणी करत उपचाराबाबत मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील जन्मजात विकार,काळजी व उपचार, लसीकरण नोंद,बालकाची वाढ व वृध्दी यासंबंधी संपूर्ण माहिती, वारंवार होणारी जुनाट सर्दी,खोकला यावर उपचार,वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या व उपचार, वारंवार होणारे पोटाचे आजार व उपचार,कमी वजनाच्या बालकांची काळजी व उपचार,बालकांचे निरोगी आरोग्य सवयी व बालकांची वाढ याविषयी डॉ.अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले या आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद .