शिरोळ तालुका ग्रामीण राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या महिला उपाध्यक्षपदी सुमन चव्हाण

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

मजरेवाडी ता.शिरोळ येथील सुमन भीमराव चव्हाण यांची शिरोळ तालुका ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(शरद पवार)गटाच्या महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.प्रदेशाध्यक्षा रोहणी खडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरोळ तालुका महिला पदाधिकारी निवडीसाठी कोल्हापूर येथे पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती.उपाध्यक्षपदासाठी तालुकाध्यक्षा स्नेहा देसाई यांनी चव्हाण यांचे नाव सुचवले तर जिल्हाध्यक्षा अश्विनीताई माने-मागूरकर यांनी अनुमोदन दिले.यावेळी शिरोळ तालुका महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यासाठी खास.सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.निवडीनंतर बोलताना उपाध्यक्षा चव्हाण म्हणाल्या फुले-शहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आणि डाव्या आघाडीला सोबत घेऊन समाजकारण करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे.या पक्षाच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे सांगितले.

error: Content is protected !!