कोयना धरण परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला

Spread the love
कोयना धरण परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला

कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 16 किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या 6 किलोमीटरवर होता.दरम्यान भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनानं दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातचं जाणवला.यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे.

error: Content is protected !!