कुरुंदवाडा / प्रतिनिधी
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आज खुले झाल्याच्या आनंदोत्सवात कुरुंदवाड शहर राममय बनले होते.प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची हलगी, खेताळ,झांज-पथकाच्या निनादात मिरवणूक तर श्री काळाराम मंदिर येथे विविध धार्मिक विधी, महापूजा, काकड आरती,आणि भक्तांसाठी प्रसाद वाटून साखर पेढे लाडू बुंदी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अयोध्या श्री राम लल्ला यांच्या जन्मभूमीत आज मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याच्या आनंदात संपूर्ण देशभर आज दिवाळी साजरी केली जात असताना कुरुंदवाड शहरातील काळाराम मंदिर येथे माझी नगराध्यक्ष जयराम पाटील,डॉ.संजय पाटील,रामचंद्र डांगे, रामचंद्र मोहिते, उदय डांगे,विजय पाटील सागर पाटील अजित देसाई यांच्या शुभहस्ते होम हवन महापूजा तीर्थपूजा जलाभिषेक,फुलाभिषेक,दुग्धाभिषेक घालून महापूजा करण्यात आली.यावेळी वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळांनी धार्मिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते.समस्त शिकलगार समाजाच्यावतीने शिवतीर्थ पासून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा पालखीची मिरवणूक सुरू झाली,पालिका चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सन्मित्र चौक, महाराणा प्रताप चौक ते वसाहती पर्यंत फुला-पाखळ्यांची उधळण करत जय श्रीरामच्या जय घोषाणे परिसर दणाणून सोडला होता.शहरातील यल्लमा-विठ्ठल मंदिर चौकात देशाच्या नकाशाची रांगोळी काढण्यात आली होती.वंदे मातरम चौकात कळी आणि युवक आझाद चौकात लाडू तर शहरात ठिकठिकाणी साखर पेढे वाटप करण्यात आले.शहरात गल्लोगल्ली रांगोळी रेखाटण्यात आली होती.शहरभर प्रभू श्री राम यांच्या प्रतिमा झळकत होत्या.सन्मित्र चौक येथे ही प्रभू श्रीराम यांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे.शहरातील सावता माळी मंदिर,विठ्ठल मंदिर,
हलसिद्धनाथ मंदिर,गणपती मंदिर, कलेश्वर मंदिर,आदी मंदिरात धार्मिक सोहळे पार पाडले.