अवघे शिरोळ शहर राममय श्रीरामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरातील गर्भगृहात श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज देशभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण असून शिरोळ येथेही भक्तिमय वातावरणात श्रीराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच श्री राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध संत महंतांच्या उपस्थितीमध्ये आयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला देशभर उत्साहाचे आणि राममय वातावरण झाले आहे. आज शिरोळ येथे श्रीराम मंदिरमध्ये पहाटे काकड आरती व अभिषेक दलित मित्र डॉ अशोकराव माने,सौ.रेखादेवी माने,विठ्ठल भाट,सौ.शोभा भाट यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.भाविकांनी श्री राम मंदिरामध्ये भगव्या टोप्या,भगवे वस्त्र परिधान करून लहान मुलासह महिला व बालकांनी दर्शनसाठी पहाटेपासून गर्दी केली होती.श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम पतित पावन सितारामचा अखंड जयघोष या निमित्ताने सुरू होता.दुपारी श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने श्रीराम मंदिरात भजन कीर्तन प्रवचन अखंड रामनाम जप असे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.दुपारी मंदिरात महाआरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी श्रीरामाच्या प्रतिमेचे शोभायात्रा काढण्यात आली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली.यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, माजी सरपंच गजानन संकपाळ,बी.जी.माने,युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने, पंडित काळे,श्रीवर्धन माने-देशमुख,तातोबा पाटील, दादासो कोळी,संभाजी भोसले,विजय आरगे,रामचंद्र पाटील,दीपक भाट,बबन बन्ने,विनोद मुळीक,अविनाश उर्फ पांडुरंग माने,धैर्यशील देसाई, अमरसिंह माने, उदय संकपाळ(शिलेदार) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्राची सुरुवात करण्यात आली.शोभा यात्रेत रथात श्री राम सीता लक्ष्मण हनुमान यांचा सजीव देखावा करण्यात आला होता.वारकरी दिंडी,पालखी,गोंधळ, धनगरी ढोल, हलगी,तुतारी,झांजपथक या पारंपारिक वाद्याच्या गजर आणि वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत अबालवृद्ध डोक्यावर कलश घेऊन महिलांसह राम भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.जय श्रीराम चा घोषणांनी परिसर दणाणला होता मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी सडा रांगोळी घालून पालखी पूजन करून या शोभायात्रेचे स्वागत केले.इस्कॉन तथा राधे कृष्ण भक्त संप्रदाय, पद्माराजे विद्यालय,जनता हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल शाळांमधील विद्यार्थी ढोल पथकासह या शोभायात्रेत सहभागी झाले होते.शिरोळ शहरांमध्ये सर्वत्र श्रीरामाचे डिजिटल फलक लावून भगवे झेंडे फडकताना सर्वत्र दिसत असल्याने भगवेमय वातावरण झाले होते.तर महिलांनी दारोदारी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व भक्तिमय वातावरण दिसत होते दिवसभरामध्ये अखंड नामजप,भजन,कीर्तन,शोभायात्रा, दीपोत्सव असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.तसेच रात्री शिवाजी चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या धार्मिक सोहळ्याचे नियोजन श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण चुडमुंगे,उपाध्यक्ष दिलीपराव माने,सचिव बाळासाहेब कोळी,खजिनदार आप्पासाहेब पुजारी,सदस्य रामचंद्र पाटील,विठ्ठल भाट,चंद्रकांत महात्मे,मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे,नरेंद्र माने,डी.आर.पाटील,चंद्रकांत भाट,किरण माने-गावडे,शिवशांत हिरेमठ, सुभाष ताराप- माने,रमेश गावडे,आनंदा माने,दीपक माने,शिवाजी भाट, देवाप्पा पुजारी,बापूसाहेब गंगधर,पारस भाट यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आजी-माजी लोकप्रतिनिधी तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी केले आहे.