खिद्रापूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.या पशूंना सकस व ओला चारा मिळावा यासाठी खिद्रापूर येथे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक जोड कार्यक्रम अंतर्गत विविध पिकापासून मूरघास निर्मिती कशी करावी, पॅकिंग याचे शेतकऱ्यांना कृषिदूतांनी प्रात्यक्षिक कृषिदूत प्रतीक बडधे,रोहित हराळे,धवलराज जगदाळे,पंकज केवारे,पवन कोळी,श्रेयस कुलकर्णी यांनी दाखवले,त्याच्या का प्रात्यक्षिकाचे शेतकऱ्यांना फायदा होणार असून मुरघास मुळे पावसाळ्यात ओल्या चाराचा प्रश्न देखील मिटणार असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस.जे.पाटील,उपप्राचार्य व या कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके,कार्यक्रम समन्वयक डॉ.रमेश कोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एस माळी तसेच प्रा.व्ही.यु.तोडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.यावेळी खिद्रापूर गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.