आता थंडी वाढत आहे तसे जो -तो सर्दी, खोकला व आवाज बसने या आजाराने त्रस्त आहे.
लक्षणे –
सर्दी, खोकला, बारीक ताप असणे, अंग दुखणे, आवाज बसणे हे नित्याचेच बनले आहे.यात विशेषतः कफ व वाताचा अनुबंध असतो.
अपथ्य (काय खाऊ नये )-
दही, ताक, वांगी, टोमॅटो, केळ, थंड पाणी, कोल्ड्रिंक, पापड, लोणचे,बटाटा,भेंडी, उडदाचे पदार्थ, हरभरा, दुधाचे जड पदार्थ.
पथ्य (काय खावे)-
मूग डाळ, ज्वारीचे अन्न, देशी गाईचे तूप,डाळिंब, पेरू, चिकू, सफरचंद, मोसंबी, दुधीभोपळा, दोडका, काकडी, पडवळ, शेवगा, घेवडा, कारले, मध, गवारी, भात.
आयुर्वेदिक उपचार –
स्नेहन, स्वेदन, लंघन,वमन,नस्य
आयुर्वेदिक औषधे –
त्रिभुवन कीर्ती रस, लक्ष्मी विलास रस, महासुदर्शन काढा.
उपाय –
1) दररोज सकाळी व रात्री न चुकता “पंचगव्य नस्य “दोन्ही नाकात घालावे. यामुळे प्रवास करताना नाकावाटे घस्यामध्ये धुळीचे कन जात नाहीत.
2) कोमट पाण्याचे सेवन करावे.
3) छातीत दाट कफ साटला असेल तर गरम मोहरी तेलाने छातीला हलकी मालिश करावी व छातीला गरम कपडाने शेकून घ्यावे.
4) खोकून खोकून घश्यात दुकत असेल तर 20ml तिळ तेलामध्ये थोडे साधे मीठ टाकून गरम करावे व प्यावे, या क्रियेमुळे छातीलतील कफ बाहेर पडायला सुरुवात होते.
5) गरम पाण्याची वाफ व नंतर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
6) तुलसी, काळी मिरी, हळद ,आले साखर घालून याचा काढा बनवावा.
7) सितोफलादी चूर्ण व टंकण एकत्रित करून मधासोबत चाटण करावे.
8) फॅन /AC लावू नये.
9) डोके छातीला थंड हवा लागू देऊ नये.
10) 3-4थेंब निलगिरी तेलात थोडी साखर मिसळून चाटल्याने देखील खोकल्यामध्ये फरक पडतो.
11) आवाज बसला असल्यास वेखंड व जेष्ठमधाचे चूर्ण एकत्रित करून दिवसातून 3वेळा मधासोबत चाटण केल्यास आवाज पूर्ववत होतो.
12) सर्दी साठी “अमृतधारा “नाकाभोवती व छातीला लावावे.
13) एका ग्लासभर एवढ्या दुधात 10लसूण पाकळ्या व हळद घालावे ते दूध उकळून -गाळून घ्यावे व त्या दुधात मध टाकून असे दूध प्राशन केल्याने ते बाधत नाही.
14) बाम भस्त्रिका, भुजंगासन,पवन मुक्तासन, वज्रसन हे 4योगाभ्यास नियमितपणे करावेत.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340