शिरोळ / प्रतिनिधी
शतकोत्तर ग्रंथालय म्हणून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असणाऱ्या येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिर आयोजित व्याख्यानमाला मंगळवार दिनांक २३ जानेवारी ते शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ अखेर होणार आहे.यावेळी विविध मान्यवर व्यक्तींचे विचार ऐकण्याची व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी यानिमित्ताने वाचक प्रेमी व नागरिकांना मिळणार आहे.
मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता ग्रंथालयाच्या समोरील पटांगणावर होणाऱ्या व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या सौ इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ अनिता माने यांच्या अध्यक्षतेखाली सौ देविका मोरे, सौ सारिका माने, सौ कल्पना काळे,सौ ऋतुजा शेट्टी, सौ प्राजक्ता गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार आहे.या दिवशी सौ राणी पाटील (भुये) यांचे आजच्या युगात स्त्रियांची भूमिका याविषयी व्याख्यान होणार आहे तर बुधवार दिनांक २४ रोजी विजय धोंडीराम जाधव (ब्रह्मानंदनगर) यांचे कथाकथन होणार आहे.गुरुवार दिनांक २५ रोजी एस बी ओऊळकर (पंढरपूर) यांचे संत वाड्मय परिचय या विषयावर व्याख्यान होणार आहे.शुक्रवार दिनांक २६ रोजी डॉ सौ स्वाती शिंदे (विटा) यांचे बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान होणार आहे.यावेळी भरत बँकेचे संचालक श्रेयस लडगे,धनंजय मुळीक,कोल्हापूर जिल्हा धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन महेश गावडे, युवा उद्योजक अभिजीत माने,दयानंद जाधव,अमोल देशमुख, दलित मित्र डॉ अशोकराव माने,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, दादासो शेट्टी,आनंदराव काळे, रावसाहेब पाटील – मलिकवाडे, मुकुंद उर्फ बाळासो गावडे, प्रा सौ माधुरी माळी,सौ चारुशीला पुजारी, सौ स्नेहल टारे, सौ सुप्रिया पाटील,प्रा सौ मुक्ता कळेकर, सौ वेदांतिका पाटील, सौ अन्नपूर्णा कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गेली २६ वर्षे राजश्री शाहू नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेच्या उपक्रमाद्वारे श्रोत्यांचे ज्ञान मनोरंजन आणि प्रबोधन होते मान्यवर व्यक्तींचे विचार ऐकण्याची व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळत असते यामुळे सर्व वाचक प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने व्याख्यानमालेस उपस्थित राहावे असे आवाहन राजश्री शाहू नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रा आण्णासो माने – गावडे उपाध्यक्ष एम एस माने कार्यवाह धनाजीराव जाधव लोकल ऑडिटर विजयसिंह माने – देशमुख यांनी केले आहे यावेळी वाचनालयाचे संचालक प्रा आप्पासो पुजारी आनंदराव माने देशमुख एन वाय जाधव रामचंद्र पाटील आप्पासो गावडे चंद्रकांत माने – गावडे बी जी माने पंडित काळे अशोक गंगधर शहाजहान शेख सचिन माळी सौ जयश्री पाटील ग्रंथपाल संभाजी चव्हाण यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते